Skip links

चंदनाच्या सुगंधाचे वाहक

प्रत्येक माणसाच्या जीवनात एखादीच व्यक्ती चैतन्य निर्माण करणारी असते. माझ्या जीवनात आनंद निर्माण करणारे, चैतन्य निर्माण करणारे (व्यक्ती म्हणणे अज्ञानी पणा ठरेल) दैवी अंशाने मंडीत झालेले मानवी प्रेम म्हणजे फादर जॉर्ज काऊकाट्ट.

१२ वर्षापूर्वी मी नवीन घर बांधत असताना माझा पहिला परिचय झाला तो फादर यांच्याशी. आजूबाजूला कुणाचेही घर नहोते , विहीर खोदताना पाण्याची आवश्यकता होती, ही गोष्ट फादर यांना सांगितली असता त्यांनी स्वतः आपल्या फार्म हाऊसच्या बाजूच्या असणाऱ्या पाण्याच्या टाकीतील पाणी स्वतः कडील पाईप द्वारे पुरविले. तिथूनच आमचा परिचय, स्नेहसंबंध वाढत जाऊन आज त्याला घनिष्ठ रूप प्राप्त झाले आहे.

माझ्यावरील संकटे, आजारपण ,विहिर, घर, तसेच नारळ,काजू ,या सारख्या झाडातून अंश रूपाने कायम माझ्या अवती भवती वास्तव्य करणारे फादर. केमिकल विरहित शेती साठी आग्रही असणारे , स्वतःच्या आहारा बाबत अतिशय दक्ष असणारे, तसेच हजारो अनाथ मुलांच्या जीवनाचे सोने करणारे, आणि ज्यांना, ज्यांना त्यांचा सहवास लाभला त्या त्या सर्वांसाठी एक अविस्मरणीय प्रेम, चैतन्य, गारवा म्हणजे फादर.

नुसते त्यांच्या देहाचे दर्शन झाले तरी त्यांची प्रसन्न मुद्रा पाहून दिवसभराचा क्षीण नाहीसा होतो. शेतीत प्रत्यक्ष काम करत असतानाच माणसांप्रमाणेच, पशू, पक्षांची चिंता असणारे, व सदैव दुसऱ्यांसाठीच आपले आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवणारे ते म्हणजेच फादर.
वृद्ध, अनाथ, आदिवासी यांच्या उत्कर्षासाठी आपले सारे जीवन व्यतीत करून, नाही ज्ञानेंन सदृशं पवित्र मिःह विद्यते या उक्ती प्रमाणे देश विदेश दौऱ्यात आपल्या अगाध ज्ञानाचे अमृत सर्वांना पाजणारी ती दिव्य शक्ती म्हणजे फादर.

फादर आज आपल्या जीवनाची यशस्वी ७४ वर्षाची परिक्रमा पूर्ण करत आहेत, त्या निमित्त आजच त्यांचे दर्शन घेतले, पावन. झालो,प्रिय येशू, जगदोधारासाठी ज्यांनी या भूतलावर जन्म घेतला त्या आमच्या पुज्य फादर यांना शतकोत्तर (१०० च्या वर) निरोगी आयुष लाभोअशी आपल्या चरणी सविनय प्रार्थना.
Father, I wish you all the best in your coming life.

Laxman Balkrishna Lingayat,
Branch manager,
Sindhudurg district Central co op bank Ltd, Anav,

Leave a comment

  1. Fr George K. Is known to me from deepti college.
    Mana
    Pune
    Thane
    Sangli
    He spoke tò the Police in ujjain, i am fr George.
    Their eyes were open
    Best wishes great missionary in the Mission field.
    Fr JV

Home
Account
Cart
Search